Share

Anil Parab | “स्वतःच्या खिशातून पैसे दिल्यासारखं…”, सामनातील जाहीरातवर अनिल परबांची प्रतिक्रिया

Anil Parab | मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारकांना दारेवर धरलं होतं. राज्यातील सरकार हे ५० खोके घेऊन सत्तेत आलेलं सरकार असल्याचा आरोप करत राज्य सरकारला खोके सरकार असं नाव देखील विरोधकांनी दिलं आहे. अशातच याच खोके सरकारची जाहिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाच्या सामना (Saamana) वृत्तपत्रात पहिल्याच पानावर झापण्यात आली आहे. त्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते अनिल परब (Anil Parab) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मला असं वाटतं की जाहिरात सरकार देतं आणि ती सगळ्यांनाच देतं. त्यासाठी कोणाच्या खिशातून पैसे जात नाहीत. हे पैसे तुमचे आमचे सर्वांचे असतात. ही कोणाचीही वैयक्तिक जाहिरात नाही, ही जाहिरात सरकारची आहे आणि जनतेच्या पैशांतून दिलेली आहे. त्यामुळे स्वतःच्या खिशातून पैसे दिल्यासारखं कोणी बोलू नये, ठाकरे गटाचे नेते अनिल परब म्हणाले.

स्वातंत्र्याची 75 वर्ष, एका वर्षात 75,000 रोजगार देण्याचा महाराष्ट्राचा महासंकल्प. पहिल्या टप्प्यातील नियुक्ती प्रदान करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम, असा या जाहिरातीवर मजकूर लिहिण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महासंकल्प कार्यक्रमाला दृकश्राव्य माध्यमातून संबोधित करणार असल्याचा या जाहिरातीत उल्लेख आहे.

यादरम्यान, प्रमुख उपस्थितांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, शंभुराज देसाई आणि उदय सामंत यांची नावे आहेत. त्याचबरोबर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचंही नाव आहे.

महत्वाच्या बातम्या :

Anil Parab | मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारकांना दारेवर धरलं होतं. राज्यातील सरकार हे ५० खोके घेऊन सत्तेत …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now