Share

Anil Parab | “किरीट सोमय्या हे नौटंकीबाज” ; फौजदारी गुन्हा दाखल करण्याची अनिल परबांची मागणी

Anil Parab | मुंबई : आज भाजप (BJP) नेते किरीट सौमय्या (Kirit Somaiyaa) दापोली दौऱ्यावर असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा एक रिसाॅर्ट जमीनदोस्त होणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब (Anil Parab) यांनी घणाघात केला आहे.

आज कोर्टाने रिसॉर्टच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्या रिसॉर्टला कोर्टाचे संरक्षण आहे. या रिसॉर्टचे बांधकाम करण्यासाठी शासनाने परवानगी दिली. त्यामुळे शासनाने परवानगी दिली असेल आणि ती चुकीचे असेल तर मालकाचा किती दोष आहे, हे तपासावे लागेल असे परब यांनी म्हटले. साई रिसॉर्टवर लावण्यात येणारा नियम हा सगळ्याच रिसॉर्टला लावावा लागणार आहे, असं अनिल परब म्हणाले.

तसेच, किरीट सोमय्या माझी बदनामी करत असल्याचा देखील परबांनी केला आहे. सोमय्यांनी आरोप केलेले नेते त्यांच्यासोबत आहेत. त्यांच्याबाबत आता एक शब्दही ते काढत नसल्याचे परब यांनी म्हटले. जनतेला हा सगळा प्रकार समजत असल्याचे सांगत सोमय्या यांच्यामुळे रत्नागिरीतील इतर रिसॉर्ट चालकांना फटका बसला असल्याचे परब यांनी सांगितले. रिसॉर्ट प्रकरणी चौकशी करणाऱ्या यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत असल्याचे परब यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जे शिंदे गटात गेलेत त्यांच्यावर बोलण्याची हिंमत सोमय्या यांच्यात नाही. नारायण राणे यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी सोमय्या हातोडा घेऊन गेले नाहीत. सुभाष देशमुख यांचे घरदेखील अनधिकृत आहे. मात्र, सोमय्या तिकडे जाणार नाहीत. सोमय्या हे स्टंट नाही तर नौटंकी करत असल्याचे परब म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Anil Parab | मुंबई : आज भाजप (BJP) नेते किरीट सौमय्या (Kirit Somaiyaa) दापोली दौऱ्यावर असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now