Share

Anil Parab | धगधगती मशाल सगळ्यांना जाळून टाकेल, अनिल परबांचा विरोधकांना इशारा

मुंबई : उद्धव ठाकरे गटला  ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव दिलं असून चिन्ह ‘मशाल’ दिलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’असं दिलं आहे.  . त्याचप्रमाणे शिंदे गटाचे तिन्ही चिन्हं निवडणूक आयोगानं अमान्य केली असून पुन्हा नव्याने तीन चिन्हे सूचवा, असं आयोगाने सांगितलं आहे. आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयावर अनेक राजकीय नेत्यांनी भाष्य केलं आहे. अशातच शिवसेना पक्षाचे नेते अनिल परब यांनी देखील आयोगाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अनिल परब ?

आम्हाला जे चिन्ह आणि नाव मिळालंय त्यावर पोटनिवडणूक लढणार आहोत. धगधगती मशाल सगळ्यांना जाळून टाकेल, असा इशारा ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी विरोधकांना दिला आहे. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, मतपेटीतून जी आग उसळेल त्यात विरोधक जळतील.

शिवसेना पक्षाचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाले असल्यामुळे त्यांच्या रिक्त जागेसाठी पोटनिवणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक 3 नोव्हेंबर रोजी होणार असून येत्या गुरुवारी 13 तारखेला नामांकन भरले जाणार आहेत. त्याचप्रमाणे ही निवडणूक महाविकास आघाडीतर्फे ही निवडणूक लढवण्यात येणार असल्याचंही परब यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस पक्षाचे नेते अमित देशमुख यांनी शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेऊन ठाकरे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे.त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाअध्यक्ष जयंत पाटील यांनीही उद्धव ठाकरे यांच्या गटाला पाठिंबा दिला असल्याचं म्हटलं आहे.

बाळासाहेबांच्या पक्षाला सोडून जाणाऱ्यांना बाळासाहेबांचं नाव आणि शिवसेना ही नावं वगळून त्यांनी निवडणुकीला सामोर जावं. लोकांना ठरवू द्या. शिवसेना, बाळासाहेबांच्या नावानं निवडून आले आहेत, असं म्हणत परबांनी शिंदे गटावर चांगलाच हल्ला केला आहे.उद्धव, बाळासाहेब ही नावं सोडून राजीनामे देऊन निवडणूक लढवावी. लोकांना ठरवू द्या. आमची भूमिका बरोबर आहे की, चुकीचं आहे, असं म्हणत एकप्रकारे शिंदे गटाला परब यांनी आवाहनच दिले आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : उद्धव ठाकरे गटला  ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव दिलं असून चिन्ह ‘मशाल’ दिलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now