महत्वाची बातमी! 10 वर्षांची सेवा असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढला

महत्वाची बातमी! 10 वर्षांची सेवा असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढला

Anil parab

मुंबई: एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी कामगारांनी गेल्या कित्येक दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. आता यावर राज्य सरकारने तोडगा काढला आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab)यांनी पत्रकार परिषद घेऊन एसटी कामगारांच्या (st bus workers)पगारवाढीची ( salary increased)घोषणा केली आहे. तसेच एसटीच्या इतिहासातील ही सर्वाधिक वाढ असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली की, आम्ही सरकारतर्फे एक प्रस्ताव ठेवला आहे. विलीनीकरणाचा निर्णय समितीने सरकारडे दिला तर तो मान्य असेल. पण तो निर्णय येईपर्यंत किंबहूना निर्णय होईपर्यंत तिढा असाच ठेवता येणार नाही. त्यामुळे सरकारने कामगारांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ त्यांच्या मूळ पगारात करण्यात येणार असल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे. यावेळी मंत्री उदय सामंत(uday samant), भाजप ()BJP)आमदार गोपीचंद पडळकर(gopichand padalkar) आणि सदाभाऊ खोत (sadabhau khot)उपस्थित होते.

अशी असेल पगारवाढ-

जे कर्मचारी एक वर्ष ते 10 वर्ष कॅटेगिरीत आहेत. त्यांच्या मूळ वेतनात पाच हजाराची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचं मूळ वेतन 12 हजार 80 होतं त्यांचं वेतन 17 हजार 80 रुपये झालं आहे. ज्यांच मूळ वेतन 17 हजार होतं. त्यांना 24 हजार पगार होणार आहे. ही वाढ 41 टक्के आहे. आतापर्यंतच्या एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी वाढ आहे. 10 ते 20 वर्षापर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 4 हजाराने वाढ केली आहे.

तसेच 20 वर्षे त्याहून अधिक असणाऱ्या कामगारांना 2 हजार 500 ने वाढ देण्यात येणार आहे. ज्यांचं मूळ वेतन 26 हजार रुपये होतं आणि त्यांचं स्थूल वेतन 37 हजार 440 रुपये होतं. त्यांचा पूर्ण पगार आता 41 हजार 40 झाला आहे. कामगारांचं म्हणणं होतं विलीनीकरण करावं आणि आमचं म्हणणं होतं की समितीसमोर विषय आहे. त्यामुळे निर्णय घेता येत नाही. त्यामुळे संप लांबतच चालला होता. विद्यार्थी आणि इतर वर्गाची गैरसोय होत होती. समितीचा अहवाल यायला उशिर असल्याने काय करायचं याचा विचार आम्ही करत होतो. अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

महत्वाच्या बातम्या