आणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत

टीम महाराष्ट्र देशा- काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. देशमुख यांच्या पावलावर पाऊल टाकत भाजप आमदार अनिल गोटे यांनी देखील आता राजीनामा देण्याची तयारी सुरु केली आहे.

आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका करीत पक्ष सोडला. गोटे यांनी अद्याप तसा पवित्रा घेतलेला नाही. मात्र धुळ्याच्या स्थानिक राजकारणात पक्षाकडूनच अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याने ते आमदारकीचा राजीनामा देणार आहेत.

Rohan Deshmukh

राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी जनजागृती यात्रा काढली होती. त्यामुळे 1995 मध्ये भाजपला सत्ता मिळाली. पण, आता मताधिक्य वाढीसाठी गुंडांना पक्षात घेत आहेत असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे म्हणणे ही चेष्टा आहे.

त्यामुळे मी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 19 नोव्हेंबरला आमदारकीचा राजीनामा देणार आहे, अशी माहिती भाजप आमदार अनिल गोटे यांनी दिली. गुन्हेगार असणाऱ्यांच्या विरोधात आपण नेहमी संघर्ष केला. आता त्यांच्यासोबत काम करणे मला अशक्य आहे. तेव्हा आपणच बाहेर पडावे, असा मी निर्णय घेतला आहे, असे गोटे म्हणाले.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...