fbpx

‘दत्तक नको तर आम्हाला आमच्या स्वत:चं पोर असलं पाहिजे, आमच्या कमरेत जोर आहे’

anil-gote

धुळे : धुळे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आ.अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री आणि भाजपवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. आम्हाला दत्तक नको. आम्हाला आमच्या स्वत:चं पोर असलं पाहिजे, आमच्या कमरेत जोर आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर शरसंधान केलं आहे.

नेमकं काय म्हणालेअनिल गोटे ?

“मुख्यमंत्री म्हणतात मी धुळे शहर दत्तक घेतलं, नाशिक दत्तक घेतलं, जळगाव दत्तक घेतलं, सांगली घेतलं. मात्र एवढ्या दत्तकानंतर तुमच्या मांडीवर आमच्यासाठी जागा तर आहे का? आम्हाला दत्तक नको. आम्हाला आमच्या स्वत:चं पोर असलं पाहिजे, आमच्या कमरेत जोर आहे”