मुंडे साहेब दिलदार होते फडणवीस विश्वासघातकी, गोटेंचा हल्लाबोल !

टीम महाराष्ट्र देशा : वेगवेगळ्या कारणांमुळे प्रारंभापासून गाजणाऱ्या धुळे महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे विरुद्ध भाजप अशी लढत झाली. भाजप नेत्यांवर आगपाखड करणारे आमदार अनिल गोटे यांनी लोकसंग्रामच्या माध्यमातून सर्व ७४ जागांवर उमेदवार दिले आहेत. बंडखोरीचा झेंडा फडकवणारे गोटे यांचे राजकीय भवितव्य ठरविणारी ही निवडणूक आहे.

बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या आ.गोटे यांनी मुख्यमंत्री आणि इतर भाजप नेत्यांवर तोफ डागली आहे. एका पत्राच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत असताना मुख्यमंत्र्यांवर देखील शरसंधान केलं आहे.