Share

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांची दिवाळी गोड होणार नाही; 1 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर केला होता. यावेळी न्यायालयाने अनिल देशमुखांचा जामीन अर्ज मंजूर करून त्यांना दिलासा देण्यात आला होता. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, हा जामीन ईडीच्या खटल्यात देण्यात आला होता. सीबीआयबाबत अजूनही न्यायालयाचा निर्णय प्रलंबित होता. मात्र यानंतर याबाबत आता देशमुखांच्या बाबतीत एक मोठी माहिती समोर आली आहे.

देशमुखांच्या कोठडीत 1 नोव्हेंबर पर्यंत वाढ

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 1 नोव्हेंबर पर्यंत वाढ करण्याचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांच्यासह कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे या आरोपींच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे.

४ ऑक्टोबर रोजी पार पडलेली सुनावणी –

हायकोर्टाने अखेर अनिल देशमुख यांना ४ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता. गेल्या ११ महिन्यांपासून अनिल देशमुख कारागृहात होते. दरम्यान अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कथित वसूली प्रकरणात अनिल देशमुख हे कारागृहात होते. २ नोव्हेंबरला ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली होती. १०० कोटी वसूली प्रकरणात ही अटक करण्यात आली होती. हे प्रकरण अनेकदा सत्र न्यायालयात आलेले होते. त्यानंतर हाय कोर्टात गेले होते. मात्र सुनावणी झाली नव्हती. नंतर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऑर्डरनुसार हायकोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाली आणि अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला आहे.

काय आहे प्रकरण?

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. मुंबईतील मोठ-मोठे डान्स बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून दर महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल केरण्याचे आदेश देशमुखांनी दिले असल्याचा धक्कादायक आरोप परमबीर सिंग केला होता. याबाबतचे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालकांना पाठवण्यात आलं होतं. राज्याच्या राजकारणात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. तर या प्रकरणामुळे विरोधकांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे देशमुखांनी त्यांच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

पुढे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली होती. ईडीने अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला होता. देशमुख यांनी मुंबईतील विविध बार आणि रेस्टॉरंटमधून सुमारे ४.७ कोटी रुपये गोळा केले. यासोबतच देशमुख यांनी चुकीच्या पद्धतीने कमावलेली रक्कम नागपुरातील श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या शैक्षणिक ट्रस्टला पुरवल्याचा आरोप ईडीने केला होता. या तपासादरम्यानच देशमुख यांना ईडीने नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक केली होती, तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर केला होता. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now