अनिल देशमुखांना हायकोर्टाचा दणका; याचिका निकाली काढण्यास दिला नकार

anil d

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर सीबीआयने सुरू केलेल्या तपासाच्या आधारे ‘ईडी’ने देखील चौकशी सुरू केली. त्याअंतर्गत अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक व स्वीय सचिवांना अटक केली आहे. मात्र अद्याप अनिल देशमुख यांची चौकशी झालेली नाही. ‘ईडी’ने त्यांना आत्तापर्यंत पाच वेळा समन्स बजावले. पण देशमुख एकदाही समोर आलेले नाहीत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी देशमुख यांनी ईडीचे समन्स रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र आता न्यायालयाने याचिका निकाली काढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे देशमुखांना सध्यातरी कुठलाही दिलासा मिळू शकला नसल्याचे पहायला मिळत आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी देशमुखांना त्यांची याचिका सुनावणीसाठी खंडपीठाकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले आहेत.

या याचिकेवर हायकोर्ट रजिस्ट्रीनं घेतलेला आक्षेप आणि ईडीनं उठवलेला सवाल हा योग्यच असल्याचं न्यायमूर्ती शिंदे यांनी मंगळवारी आपल्या निकालात सपष्ट केलं. त्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या समन्सविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या अनिल देशमुखांना आपली याचिका नव्यानं सादर करावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या