मुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ‘ईडी’समोर महत्त्वपूर्ण खुलासा केला असून कुंटे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असताना अनिल देशमुख(Anil Deshmukh) पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत यादी पाठवत आहे, असा गंभीर आरोप सीताराम कुंटे यांनी केला आहे. ७ डिसेंबर रोजी मनी लाँड्रिंगप्रकरणी तपास करत असताना कुंटे यांनी ही माहिती ईडीला दिली आहे.
कुंटे यांनी सांगितले की, अनिल देशमुख हे गृहमंत्री असतांना मला पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे. यामध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्याची कुठल्या जागी आणि कोणत्या पदावर बदली करायची, हे नमूद केलेले असायचे. अनिल देशमुख यांनी स्वीय सहायक संजीव पालांडे यांच्यामार्फत या अनधिकृत याद्या माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात असत. मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अधीन काम करत असल्याने संबंधित याद्या स्वीकारण्यास नकार देऊ शकत नव्हतो. त्यामुळे पोलीसांच्या बदल्या करताना या नावांचा समावेश केला जायचा,’ असे कुंटे म्हणाले.
दरम्यान, कुंटे यांनी देशमुख यांच्या हस्तक्षेपाची कबुली दिल्यामुळे विरोधी पक्षाला महाविकासआघाडी सरकारविरोधात नवा मुद्दा मिळाला असून या मुद्द्यावरुन आता भाजपच्या नेत्यांनी टीकास्त्रांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
निर्णय असंवैधानीक, सभागृहाबाबत निर्णयाचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही-प्रकाश आंबेडकर
“मुख्यमंत्री ठाकरेंना घेऊन ‘क्रांतिवीर’ पार्ट -2 काढता येईल”, भातखळकरांचा हल्लाबोल
U-19 WC : पाकिस्तानला पराभूत करत ऑस्ट्रेलियाची उपांत्यफेरीत धडक
भाजप ठरला देशातील सर्वात श्रीमंत पक्ष तर दुसऱ्या क्रमांकावर बसपा