Share

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांची सुटका, आर्थर रोड कारागृहाबाहेर राष्ट्रवादीचा जल्लोष

Anil Deshmukh | मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची आज (बुधवार) तुरुंगातून सुटका झाली. मुंबईतील आर्थर रोड कारागृहाबाहेर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात ते बराच काळ तुरुंगात होते. देशमुख यांची सुटका होण्यापूर्वीच त्यांचे समर्थक तुरुंगाबाहेर उपस्थित होते. अनिल देशमुख तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत.

अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने १२ डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. परंतु सीबीआयने जामीनावरील स्थगिती आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी अर्ज दाखल केला, ज्याला मुंबई उच्च न्यायालयाने मंजूरी दिली आणि सीबीआयच्या विनंतीवरून उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात जामीन आदेशावरील स्थगिती २७ डिसेंबरपर्यंत वाढवली. होते. मात्र, त्याची आणखी तीन दिवसांची मुदतवाढ मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली.

अनिल देशमुख यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार, जयंतराव पाटील, दिलीप वळसे पाटील, खासदार प्रफुल पटेल व खासदार सुप्रियाताई सुळे यांनी स्वागत केले.

महत्वाच्या बातम्या : 

Anil Deshmukh | मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची आज (बुधवार) तुरुंगातून सुटका झाली. मुंबईतील …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now