Anil Deshmukh | मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या सीबीआय (CBI) प्रकरणात जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. अनिल देशमुख यांचा जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ईडीनंतर आता सीबीआय प्रकरणातही अखेर जामीन मंजूर झालाय. कोर्टाकडून अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मोठा दिलासा मिळालाय.
महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांनी 26 ऑक्टोबर रोजी 100 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यापूर्वी 21 ऑक्टोबर रोजी विशेष सीबीआय न्यायालयाने देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यांनतर सीबीआयने सहाय्यक सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांची प्रकृती खराब असल्याचे सांगत सुनावणी पुढे ढकलली होती. न्यायाधीश एम.एस कर्णिक यांच्या खंडपीठापुढे अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली.
काय आहे प्रकरण?
अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. मुंबईतील मोठ-मोठे डान्स बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून दर महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल केरण्याचे आदेश देशमुखांनी दिले असल्याचा धक्कादायक आरोप परमबीर सिंग केला होता. याबाबतचे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालकांना पाठवण्यात आलं होतं. राज्याच्या राजकारणात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. तर या प्रकरणामुळे विरोधकांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे देशमुखांनी त्यांच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
पुढे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली होती. ईडीने अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला होता. देशमुख यांनी मुंबईतील विविध बार आणि रेस्टॉरंटमधून सुमारे ४.७ कोटी रुपये गोळा केले. यासोबतच देशमुख यांनी चुकीच्या पद्धतीने कमावलेली रक्कम नागपुरातील श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या शैक्षणिक ट्रस्टला पुरवल्याचा आरोप ईडीने केला होता. या तपासादरम्यानच देशमुख यांना ईडीने नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक केली होती, तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Rajinikanth | बस कंडक्टर ते थालाइवा कसा होता रजनीकांतचा प्रवास?, जाणून घ्या
- Supriya Sule | चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” गृहमंत्र्यांचा कायदा…”
- Asim Sarode | “शाईफेक प्रकरणी अटक केलेल्या आरोपींचा खटला मोफत चालवणार”; असीम सरोदे यांची घोषणा
- Raju Shetti | शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडेंवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल; राजू शेट्टी म्हणाले, “तालिबान्यांसारखे…”
- Manoj Garbade | मनोज गरबडे वरील कारवाई बेकादेशीर?; सोशल मीडियावर ‘Release Manoj Garbade’ ट्रेण्डवर