आदित्य ठाकरेंच्या ‘नाईट लाईफ’ला गृहमंत्री अनिल देशमुखांचा खो ?

टीम महाराष्ट्र देशा : आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई नाईट लाईफला २६ जानेवारीपासून मुंबईत सुरवात होत आहे . यामुळे मुंबईत हॉटेल, पब, मॉल, मल्टीप्लेक्स २४ तास सुरू राहणार आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंबंधीच्या बोलावलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

या बैठकीत मनपा आयुक्त प्रवीण परदेशी, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे अधिकारीही उपस्थित होते. तर हॉटेल आणि मॉल मालकांचे प्रतिनिधीही बैठकीला उपस्थित होते. यामुळे आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई नाईट लाईफला हिरवा कंदील मिळाला असून २६ जानेवारीपासून याची अंमलबजावणी सुरु होईल अशी माहिती आहे .

Loading...

मात्र आता आदित्य ठाकरेंच्या या महत्वाकांशी प्रकल्पाला खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच कात्रजचा घाट दाखवला आहे. “आम्ही लवकरात लवकर या योजनेबाबत आढावा घेऊ. यानंतर या योजनेती अंमलबजावणी करायची की नाही यावर आम्ही निर्णय घेऊ. २६ जानेवारीपर्यंत या योजनेची अंमलबजावणी होऊ शकेल असं मला वाटत नाही. अखेर हा विषय कॅबिनेटमध्ये येईल. तेथे यावर सविस्तर चर्चा होईल. त्याचा यंत्रणेवर किती परिणाम होऊ शकतो, यंत्रणा किती वाढवावी लागेल याचा विचार होईल. यानंतरच या योजनेची अंमलबजावणी करायची की नाही यावर निर्णय होईल.” अस गृहमंत्री म्हणाले आहेत.

यानंतर देशमुख यांनी आदित्य ठाकरेंच्या योजनेला खो घातल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आदित्य ठाकरेंच्या या योजनेला पाठिंबा दिला आहे. तसेच ज्यांना मुंबईची माहिती नाही तेच याला विरोध करत असल्याचा आरोप केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'