Share

Anil Desai । “माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले”, म्हणणाऱ्या फडणवीसांवर ठाकरे गटाकडून पलटवार

Anil Desai । मुंबई : बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यावर रवी राणा (Ravi Rana) यांनी पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचे आरोप केले होते. यावरून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात गेले अनेक दिवसांपासून चांगलाच वाद पेटलेला आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट करत बच्चू कडू यांच्याबद्दल एक विधान केलं. बच्चू कडू माझ्या एका फोन वर गुवाहाटीला आले असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर अनिल देसाई (Anil Desai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीशी आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याशी आमचा संबंध नसल्याचं भाजपच्या वतीने सांगण्यात आलं होत. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या विधानाचा ठाकरे गटाकडून समाचार घेण्यात आला आहे. अनिल देसाई म्हणाले की, “अर्थात, म्हणजे कशा प्रकारे, काय रितीने सुरु होतं हे कळतंय ना. कोणाचे आदेश पाळले जात होते, कोणाचा शब्द अंतिम असतो, कोणाच्या इशाऱ्यावर कोण चालतं हे त्यांच्याच शब्दात महाराष्ट्राच्या जनतेसमोर येत आहे”.

दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांची अपात्रता आदी मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात फडणवीस कसे कलाकार आहेत याचं वर्णन केलं होतं. लोकांनाही हे कळलं आहे. सुप्रीम कोर्ट या सगळ्याची दखल घेईल आणि त्याप्रमाणे न्याय होईल अशी आशा आहे, असंही अनिल देसाई यावेळी बोलताना म्हणाले.

काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस?

ते म्हणाले कि, बच्चू कडू माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. बच्चू कडू यांना मी स्वत: फोन केला. त्यांना म्हटलं की आपल्याला सरकार बनवायचंय. आमची अशी इच्छा आहे की आपण युतीत असावं. त्यामुळे आपण गुवाहाटीला गेलं पाहिजे. या माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले, असं फडणवीसांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

Anil Desai । मुंबई : बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यावर रवी राणा (Ravi Rana) यांनी पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचे आरोप …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics