fbpx

अहमदनगर : उपमहापौरपदी शिवसेनेचे अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेत शिवसेनेचे अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपमहापौर निवडीला अवघे काही तास उरले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला होता. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक अनिल बोरुडे हे अहमदनगरचे नवे उपमहापौर होणार हे निश्चित झाले होते..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपच्या श्रीपाद छींदमची अहमदनगर महापालिकेच्या उपमहापौर पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर उपमहापौर पदी कोणाची वर्णी लागणार याबद्दल बरेच तर्कवितर्क लावेल जात होते.

छींदमने केलेल्या विधानाचे प्रायश्चित म्हणून आपण उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार नसल्याच भाजपने जाहीर केल होते. दरम्यान, उपमहापौर निवडणुकीत आता राष्ट्रवादीने देखील माघार घेतल्याने शिवसेनेचे नगरसेवक अनिल बोरुडे हे बिनविरोध अहमदनगरचे नवे उपमहापौर झाले आहेत.