राफेल करारात अनिल अंबानींच्या टेलिकॉम कंपनीला तब्बल १ हजार १२० कोटी रुपयांची करमाफी

टीम महारष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकींच्या धामधुमीतच राफेल घोटाळा आता पुन्हा एकदा डोक वर काढू लागला आहे. कारण फ्रान्समधील ‘ले मॉन्ड’ या फ्रेन्च वृत्तपत्राने अनिल अंबानी यांच्या फ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला १४३.७ मिलियन युरो म्हणजे तब्बल १ हजार १२० कोटी रुपयांची करमाफी देण्यात आली असल्याचा दावा केला आहे.

‘ले मॉन्ड’ने दिलेल्या वृत्तानुसार फेब्रुवारी ते ऑक्टोबर २०१५ दरम्यान भारत आणि फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहार सुरु होता. याच कालावधीमध्ये अनिल अंबानी यांच्या कंपनीचा १४३.७ मिलियन युरोंचा (११२० कोटी रुपये) कर माफ करण्यात आला आहे. मोदींच्या फ्रान्स दौऱ्यानंतर ‘रिलायन्स अॅटलान्टिक फ्लॅग फ्रान्स’या अनिल अंबानी यांच्या कंपनीला सूट देण्यात आली आहे असा दावा या वृत्तातून केला जात आहे.

दरम्यान, राफेल विमान खरेदी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला मोठा दणका दिला आहे. राफेल गैरव्यवहार प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे आता विरोधकांची याबाबत काय भूमिका असणार आहे हे पाहण औत्सुक्याचे ठरणार आहे.