fbpx

अनिल अंबानींचा कॉंग्रेस विरोधातील मानहानीचा दावा मागे

टीम महाराष्ट्र देशा : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांनी राफेल मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि नॅशनल हेरॉल्ड या वर्तमानपत्राविरुद्ध केलेला पाच हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा मागे घेतला आहे.

अहमदाबादच्या न्यायालयात नॅशनल हेरॉल्डमध्ये राफेल सौद्याबाबत प्रसिद्ध केलेल्या लेखाविरोधात रिलायन्स समूहाने हा दावा दाखल केला होता. या खटल्यावर अहमदाबादचे सिव्हिल आणि सेशन न्यायाधीश पी. जे. तमकुवाला यांच्या कोर्टात कामकाज सुरु होते.

आम्ही प्रतिवाद्यांना त्यांच्यावरील खटले मागे घेत असल्याबाबत सूचित केलं आहे, अशी माहिती अंबानींचे वकील राकेश पारिख यांनी कोर्टात दिली.