कोरोनाचे नियम मोडून महाबळेश्वरमध्ये अनिल अंबानी पत्नीसह इव्हिनिंग वॉकला

anil ambani

महाबळेश्वर : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

परंतु या सर्व नियमांनाकेराची टोपली दाखवून अनिल अंबानी कुटुंब इव्हिनिंग वॉक आणि मॉर्निंग वॉकसाठी कायमच महाबळेश्वरातील रस्त्यावरती फिरताना अनेकांना दिसत असतात. वॉकची सवय असलेले अनिल अंबानी हे रोज सायंकाळी आपली पत्नी टिना अंबानीसह येथील गोल्फ मैदानावर वॉक घेण्यासाठी येतात. याच ठिकाणी गावातील काही मोजकी मंडळी देखील वॉकसाठी नियमित येत असतात. सध्या या मैदानावर अनिल अंबानी हे आपल्या पत्नीसह रोज वॉक साठी येतात याची खबर शहरात पसरली. त्यामुळे वॉकसाठी जी काही मंडळी इतर ठिकाणी जात होती त्यांनी आपली रोजची जागा बदलुन येथील गोल्फ मैदानावर वॉक सुरू केला. त्यामुळे हळुहळु या मैदानावर वॉकसाठी नागरीकांची गर्दी होऊ लागली.

यामुळे आता मैदानाची मालकी असलेल्या संस्थेला पालिकेने नोटीस बजावुन दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. पालिकेने नोटीस बजावल्यामुळे दि क्लब ने गोल्फ मैदानाला टाळे ठोकले आहे. आता या मैदानावर कोणालाही प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे इव्हिनिंग वॉक घेणारे उदयोगपती अनिल अंबानी यांच्यासह द क्लब च्या गोल्फ मैदानावर अनेकांचे इव्हिनिंग वॉकिंग बंद झाले आहे.

महत्वाच्या बातम्या