अनिल अंबानी पुन्हा आर्थिक अडचणीत, चीनच्या तीन प्रमुख बँकांचे थकवले कर्ज

blank

टीम महाराष्ट्र देशा : रिलायन्स समूहाचे मालक अनिल अंबानी यांच्याविरूद्ध लंडनच्या एका न्यायालयात 680 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 47,600 कोटी रुपये) न भरल्याबद्दल चीनच्या तीन प्रमुख बँकांनी खटला दाखल केला आहे. औद्योगिक आणि वाणिज्यिक बँक ऑफ चायना लिमिटेड, चायना डेव्हलपमेंट बँक आणि चीनची निर्यात-आयात बँक या तिन्ही बँकांनी अनिल अंबानी यांच्यावर खटला दाखल केला आहे.

या बँकांचा असा दावा आहे की, रिलायन्स कम्युनिकेशन्सने (आरकॉम) 2012 मध्ये अनिल अंबानी यांच्या वैयक्तिक हमीच्या अटीवर 925.5 दशलक्ष (सुमारे 65 हजार कोटी रुपये) कर्ज दिले होते. त्यानंतर अनिल अंबानी यांनी या कर्जाची वैयक्तिक हमी घेण्याचे सांगितले होते परंतु फेब्रुवारी २०१७ नंतर कंपनी कर्जाची परतफेड करू शकली नाही.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार अनिल अंबानी यांचे म्हणणे आहे की, त्यांनी वैयक्तिक सोई पत्र देण्याबद्दल बोलले होते. परंतु हमी देण्यासाठी खासगी मालमत्तेची कधीही ऑफर केली गेली नाही. यावर अनिल अंबानी यांचे वकील रॉबर्ट हाऊ म्हणाले की, अनिल अंबानी आणि त्यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्समध्ये फरक न करण्याची बँकांनी सातत्याने चूक केली आहे. त्यामुळे अनिल अंबानी यांना पुन्हा एकदा न्यायालयाचीवारी करावी लागणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान अनिल अंबानी आणि त्यांची कंपनी न्यायालयात गेल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी एरिक्स विवाद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात अनिल अंबानी यांच्याविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एरिक्सनला 550 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठा भाऊ मुकेश अंबानी यांनी अनिल अंबानी यांना कर्ज फेडण्यास मदत केली होती.

महत्वाच्या बातम्या