अनिकेत विश्वासराव आणि प्रार्थना बेहेरेचा लोणावळ्याजवळ अपघात

पुणे: अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला लोणावळ्याजवळ अपघात झाला असून या अपघातातून दोघेही बचावले आहेत. प्रार्थनाचा हात फ्रॅक्चर झाला असून तिच्या डोक्याला मार लागला आहे. लोणावळ्याजवळ घाटात एक टेम्पो बंद पडला होता. त्या टेम्पोचा अंदाज न आल्याने, तो चुकवण्याच्या नादात गाडीला अपघात झाला.

आगामी ‘मस्का’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनिकेत, प्रार्थना आणि प्रार्थनाची मैत्रीण हे तिघे कोल्हापूरला निघाले होते. कोल्हापूरकडे जात असताना, त्यांच्या गाडीला अपघात झाला. आज सकाळी 8 च्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला.

prathana behere and aniket vishwas rao accidentलोणावळ्याजवळ घाटात एक टेम्पो बंद पडला होता, टेम्पोजवळून जात असताना कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने टेम्पोला धडक दिली. सुदैवानं या अपघातात तिघेही बचावले. प्रार्थनाच्या हाताला आणि डोक्याला मार लागला असून तिला उपचारासाठी लोणावळा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

सीटबेल्ट लावून बसल्यामुळे आपण वाचलो असल्याची कबुली अनिकेत विश्वासरावने दिली. सीटबेल्ट नसता तर मलाही दुखापत झाली असती. अपघात हा खूप भीषण होता. बाजूलाच दरी होती पण सुदैवाने आम्ही वाचलो असल्याच अनिकेत विश्वासराव याने सांगितले.

या मोठया संकटातून बाहेर पडत मस्काची टीम “शो मस्ट गो ऑन” या उक्तीला अनुसरून निघाली कोल्हापूरला.

You might also like
Comments
Loading...