विधानपरिषद निवडणूक निकाल; रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून अनिकेत तटकरे विजयी 

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांचा निकाल आज जाहीर झाला असून, लातूर-बीड-उस्मानाबाद या मतदारसंघाचा निकाल हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राखून ठेवला आहे. त्यामुळे या जागेची मतमोजणी लांबणीवर गेली आहे.

दरम्यान रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोकण विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत सुनील तटकरे विजयी झाले आहेत. कोकण मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांना 620 तर शिवसेनेच्या राजीव साबळे यांना 306 मते मिळाली आहेत. तर परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झालेत.