अनिकेत तटकरे यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

मुंबई : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या स्थानिक प्रधिकरण संस्थेतून निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य अनिकेत सुनील तटकरे यांनी आज विधान भवनात विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, आमदार सर्वश्री सुनील तटकरे, हेमंत टकले, जयंत पाटील, नवाब मलिक आणि श्रीमती विद्या चव्हाण उपस्थित होते.

तसेच यू.के.चव्हाण, उपसचिव विलास आठवले, शिवदर्शन साठे, सभापतींचे सचिव महेंद्र काज, अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, अवर सचिव सुनील झोरे, रवींद्र जगदाळे, पूनम ढगे आदी उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...