अनिकेत कोथळे खून; आणखी सात पोलिस कर्मचारी निलंबित

Aniket Kothale Murder News

सांगली  : अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी सांगली पोेलिस ठाण्यातील ठाणे अंमलदारासह सात पोलिस कर्मचा-यांना शनिवारी निलंबित करण्यात आले. या प्रकरणातील निलंबित पोलिस कर्मचा-यांची संख्या आता १२ झाली आहे. या प्रकरणात शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) शाखेसह अन्य काही जणांची नावे पुढे आल्याची चर्चा असून या चर्चेने अन्य अधिकारी- कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत.

Loading...

निलंबित करण्यात आलेल्यात ठाणे अंमलदार मिलिंद शिंदे, त्याचा मदतनीस जी. जे. व्हावल, प्रदीप जाधव, स्वरूपा पाटील, श्रीकांत बुलबुले, जयश्री वाझे व एस. व्ही. साबळे या सात जणांचा समावेश आहे. या सर्वांवर निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह त्याच्या साथीदारांना अप्रत्यक्षरित्या मदत केल्याचा व आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.

या सातजणांचीही राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्यावतीने सखोल चौकशी केली जाणार आहे. शुक्रवारी रात्री उशिरा राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजयकुमार वर्मा व अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांनी सांगली जिल्हा पोलिस मुख्यालयात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील, पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे व अतिरिक्त पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे यांच्यासमवेत बैठक घेतली. या बैठकीत या सातजणांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या सात पोलिस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले.Loading…


Loading…

Loading...