अनिकेत घुले मावळ विधानसभा मतदारसंघातून ठरणार जायंट किलर ?

टायगर ग्रुपचे संघटन येणार का कामी ?

टीम महाराष्ट्र देशा : आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मावळ विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना यांच्यात सरळ लढत होणार आहे. भाजप कडून बाळा भेगडे या ठिकाणी आमदार आहेत. तर शिवसेनेकडून चेहऱ्याचा शोध सुरु आहे. सेनेत मावळमधून इच्छुकांची भाऊगर्दी असून यामध्ये युवा सेनेचे मावळ तालुकाप्रमुख अनिकेत घुले यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. अनिकेत घुले यांच्यामागे युवा सेना आणि टायगर ग्रुपच्या माध्यमातून युवकांची मोठी फळी उभा राहिली आहे, त्यामुळे अनिकेत घुले मावळ मधून ठरणार जायंट किलर शक्यता आहे.

पहा अनिकेत घुले यांची सडेतोड मुलाखत

bagdure

दरम्यान, आगामी निवडणुकीला शिवसेना-भाजपची युती होण्याची शक्यता नाही. त्यामुळे लोकसभेला भाजपचा उमेदवार मावळातीलच देण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. मावळात भाजपकडून दोन वेळेसच आमदारकीची संधी दिली जाते. दिगंबर भेगडे दहा वर्ष आमदार होते. आता बाळा भेगडे गेल्या साडे आठ वर्षांपासून आमदार आहेत. त्यामुळे या दोघांपैकी एकाला लोकसभेची उमेदवारी देऊन बढती देण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून जोर धरु लागली आहे. त्यामुळे समोर शिवसेनेचे आव्हान पाहून भाजप सावध पवित्रा घेणार असल्याचे बोलले जात आहे.

You might also like
Comments
Loading...