बुडत्या जहाजातून पहिल्यांदा उंदरंचं बाहेर पडतात, राष्ट्रवादी उपाध्यक्षांची संतप्त प्रतिक्रिया

ncp

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करत आहेत. हे पक्षांतर खास करून भाजप- सेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. या पक्षांतराचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसत आहे. तर आता पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून टीका होत आहे. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांनी देखील टोला लगावला आहे. जहाज बुडत असताना पहिल्यांदा उंदरं बाहेर पडतात, अशा शब्दात त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभेच्या निवडणुका आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र त्याचवेळी विरोधकांच्या एक जुटीला खिंडार पडले आहे. अनेक नेते सत्तेच्या हव्यासापोटी पक्षांतर करत आहेत. तर अनेकांनी आपले घोटाळे अबाधित आणि झाकून ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे राज्यात येत्या विधानसभेला एक अंगी निवडणूक होणार असल्याच दिसत आहे. सत्तधारी भाजप युतीसाठी ही जमेची बाजू असली तरी संविधानिक तत्वाला छेद देणारी आहे.

दरम्यान राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारी असलेल्या नेत्यांची यादी माध्यमांकडे आली आहे. यामध्ये संग्राम जगताप, वैभव पिचड, राणाजगजितसिंह पाटील, अवधुत तटकरे, बबन शिंदे, संदीप नाईक, दिलीप सोपल, चित्रा वाघ, आणि शिवेंद्रराजे भोसले हे नेते देखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.