संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासन नाराज, पगारात झालेली वाढ सरकार रद्द करणार ?

st strick

मुंबई : राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पगारवाढीची घोषणा केली मात्र, ती फसवी असल्याने पुन्हा एकदा राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला. कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून अघोषित संपावर गेले होते. संपामुळे शुक्रवारी १५ कोटींच्या महसूलावर पाणी सोडावे लागले.

दरम्यान, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासन नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात झालेली वाढ रद्द करण्याचा प्रशासन विचार करत असल्याचे वृत्त आहे.

संप मोडून काढण्यासाठी सरकारनं संपकरी कामगारांची धरपकड सुरू केली आहे. तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी व स्कूल बसना वाहतुकीची परवानगी दिली गेली.

परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले, संपाबाबत कोणत्याही संघटनेने अधिकृत पत्र दिलेले नाही. काही ठिकाणी कर्मचारी गैरहजर राहिले. या पद्धतीने प्रवाशांना वेठीला धरणे गैर आहे. वेतनकरार मान्य नसेल, तर औद्योगिक न्यायालयात जाण्याचा मार्ग खुला आहे