नाहीतर बँक फोडून टाकेन, संतापलेल्या नवनीत राणांनी दिला बँक फोडण्याचा इशारा

टीम महाराष्ट्र देशा : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा मेळघाटाच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी असलेल्या चुर्णी गावातील अलाहावाद बँकेचे कर्मचारी आणि अधिकारी तेथील आदिवासींना त्रास देत असल्याच्या तक्रारी त्यांच्या कानावर येत होत्या. या तक्रारींची दखल घेत त्या आज गावतील बँकेच्या शाखेत पोहोचल्या.त्यावेळी संतापलेल्या राणा यांनी बँक कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना बँक फोडण्याचा इशारा दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी आदिवासी लोकांना त्रास देतात आणि तासनतास रांगेत उभे ठेवतात, बँकेतून एक हजार रुपये काढायचे असल्यास चार दिवस बँकेच्या चकरा माराव्या लागतात, अशा प्रकारच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून खासदार नवनीत राणा यांच्याकडे येत होत्या.

Loading...

या तक्रारींबाबत माहिती घेण्यासाठी नवनीत राणा चुर्णी गावातील बँकेत पोहचल्या, तेव्हा ग्राहकांनी त्यांना बँकेकडून होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. नवनीत राणा यांनी यासंदर्भात बँक कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे नवनीत राणा यांना राग अनावर झाला. ‘पाच वाजेपर्यंत मी इथेच थांबते. तोपर्यंत योग्य उत्तर मिळालं नाही, तर बँक फोडून टाकेन, असा दमही त्यांनी दिला. शेवटी पाच वाजता बँकेने लेखी आश्वासन दिल्यानंतर नवनीत राणा तिथून निघाल्या.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...