नाराज खासदार नाना पटोले यांचा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीवर बहिष्कार 

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी चेहरा म्हणून समोर आलेले भंडारा गोंदियाचे भाजप खासदार नाना पटोले यांनी आता भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर बहिष्कार टाकत  राष्ट्रीय कार्यकारिणीकडे पाठ फिरवली आहे.

नियोजित कार्यक्रमांमुळे बैठकीला जाऊ शकलो नाही’ पक्षानं विचारल्यास अनुपस्थितीचं कारण देईन अस नाना पाटोले यांनी स्पष्ट केलय.

दरम्यान , नाना पटोले गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांचे वागणे हुकूमशहासारखे असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. त्याला दुजोरा देणारे वक्तव्य नाना पटोले यांनी करून एकच खळबळ उडवून दिली होती .