fbpx

उस्मानाबाद : मनसे आघाडीवर नाराज; महाराष्ट्र सैनिक वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत

तुळजापूर- लोकसभा निवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आघाडी उमेदवार साठी मनसैनिकांनी काम करावे असे आदैश दिले असताना व मनसे सैनिक आदेशाचे पालन करण्यासाठी तयार असताना ही आघाडीकडून मनसेची अपेक्षित दखल न घेतल्याने मनसे सैनिक संतप्त झाले असुन ते वेगळी भूमिका घेण्याच्या पाविञ्यात आहेत.

महाराष्ट्र सैनिक आदेशाप्रमाणै राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासाठी काम करण्याच्या तयारीत असताना ही उमेदवार अर्ज दाखल करणे प्रचारामध्ये सामावून न घेणे या प्रकारामुळे मनसे सैनिक संतप्त झाले असुन जिथे सन्मान मिळत नाही तिथे काम काय करायचे अशी प्रतिक्रिया देत आहात.

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या खालोखाल मनसेला मानणारा वर्ग आहे. मनसेने मागील पाच वर्षात अनेक आंदोलन करुन जिल्हयात ऐक ओळख निर्माण केली आहे.उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात अंत्यत अटीतटीची निवडणूक होत असुन यात मनसे ची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.इकडे शिवसेनेचे नेत्यांचे मनसे च्या नेत्यांशी शिवसेना ऐकसंघ असताना असलेल्या संबधाचा आधारे मनसेला आपल्या कडे खेचण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

आघाडी उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांना दुखावणे परवाडणारे नसल्याचे काँग्रेस चे नेते मंडळी खाजगीत बोलत आहेत. सदरील प्रकार सैनिक राज ठाकरे यांच्या कानावर घालुन त्यांना आम्ही वेगळी भूमिका घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.