नाराज एकनाथ खडसे अचानक दिल्लीला का गेले ?

eknath khadse

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे आज सकाळी तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. मात्र त्यांच्या अचानक दिल्लीला जाण्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. दरम्यान काही दिवसांपासून खडसे पक्षावर नाराज असल्याचा चर्चा सुरु आहेत. अशातच त्यांनी आपल्याला वेगळा विचार करावा लागेल..असा ईशारा दिल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

एकनाथ खडसे यांनी वेगळा विचार केलाच तर पर्याय म्हणून ते शिवसेना’ कॉंग्रेस की राष्ट्रवादी’ यापैकी कोणत्या पक्षात जातील, याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहे. भाजप विरोधी चेहरा, अभ्यासू वक्तृत्व आणि आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे ते ज्या पक्षात जातील त्या पक्षाला त्यांच्या या गोष्टींचा फायदा नक्कीच होणार आहे.

Loading...

मात्र एकनाथ खडसे यांनी पक्षांतर करणार नाही आजपर्यंत ठामपणे सांगितले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोअर कमेटीची बैठक पार पडली या बैठकीनंतर मात्र त्यांनी पक्ष आपल्यावर वारंवार अन्याय करीत राहिल्यास आपल्याला वेगळा विचार करावा लागेल’, असा इशाराच दिला आहे. त्यांनी पक्षाला प्रथमच असा इशारा दिला आहे.

तथापि, राज्यात भाजपची सत्ता असतांना गैरव्यवहाराच्या आरोपावरून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर जाण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारीदेखील नाकारण्यात आली. त्यामुळे खडसे यांनी स्वत:हूनच पक्ष सोडवा, असेही पक्षाच्या नेतृत्वाला कदाचित वाटत असावे असेही संकेत आहेत. त्यामुळे नेते त्यांना पक्षांतर करण्यापासून थांबतील,असे तूर्तास तरी वाटत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'