‘थोडेसे मायबाप’ सर्वेक्षणास अंगणवाडी सेविकांचा विरोध!

औरंगाबाद : अंगणवाडी सेविकांना ‘थोडेसे मायबाप’ साठी या उपक्रमाअंतर्गत साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या सोबतच सर्वेक्षण करून सहापानी अहवाल भरून देण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत. मात्र आपण हे काम करणार असल्याची भूमिका अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी संघटनेने घेतली आहे. त्यासंदर्भात बाल विकास प्रकल्प अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्णयानुसार सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण २०१३ चा अंमलबजावणीसाठी औरंगाबाद जिल्हा विभागातील सर्व विभागांना ‘थोडेसे मायबापांसाठी पण’ या उपक्रमाअंतर्गत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अंगणवाडी सेविका भरती फॉर्म पाच रुपये मोबदला दिला जाईल. असे सांगण्यात आले आहे. अंगणवाडी सेविकेच्या बाल विकास योजनेची कामे आहेत. त्यात वजन उंची घेणे, एचआर वाटप करणे, तरंग सुपोशित अंतर्गत गृहभेटी देणे अशी अनेक कामे अंगणवाडी सेविका करत आहेत.

मात्र असे असताना मायबाप उपक्रमाअंतर्गत सर्वेक्षणाचे काम आम्ही करू शकत नाही. ते काम आमच्या विभागाचेच नाही अशी भूमिका अंगणवाडी सेविकांच्या संघटनेने घेतली आहे. संघटनेचे तालुका अध्यक्ष तथा राज्य परिषद सदस्य शालिनी पगारे यांच्या नेतृत्वाखाली वैजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत व बाल विकास प्रकल्प अधिकारी रामेश्वर खडसे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. हे काम करण्यासाठी अंगणवाडी सेविकांवर दबाव टाकला जात असून अशा प्रकारचा कुठलाही दबाव टाकण्यात येऊ नये. अन्यथा या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येईल असेही त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या