पुण्यासह राज्यातील अंगणवाडी सेविका आजपासून बेमुदत संपावर

अंगणवाडी

पुणे : राज्यातील अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी आजपासून (११ सप्टेंबर) बेमुदत संपावर आहेत. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने हा संप पुकारण्यात आला आहे.

अंगणवाडी सेविकांना सध्या दरमहा पाच हजार रुपये तर मदतनिसांना अडीच रुपये असे वेतन मिळते. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी देण्यात यावी, तसेच मदतनिसांना सेविकांच्या ७५ टक्के वेतन देण्यात यावे, अशी मागणी वारंवार सरकारकडे करण्यात आली होती.

याबाबत वारंवार आंदोलन करून देखील अद्याप मागण्या मान्य झालेल्या नसल्याने दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज (११ सप्टेंबर) रोजी राज्यभर बेमुदत संप पुकारला आहेLoading…
Loading...