…तर आम्ही जगायचे कसे ; अंगणवाडी सेविकांचे पंकजा मुंडेंना पत्र

pankaja mundhe and aganwadi sevak

टीम महाराष्ट्र देशा : घराची जबाबदारी आमच्यावर असून ऐंशीच्या दशकात आम्ही अंगणवाडी सेविका म्हणून कामास सुरुवात केली. आता सरकार एका आदेशाने आमचे निवृत्तीचे वय ६० करणार असेल तर आम्ही जगायचे कसे असा सवाल करत आमची सेवा मेस्मा कायद्याअंतर्गत आणू नका, अन्यथा आम्ही आत्मदहन करू, अस पत्र अनेक अंगणवाडी सेविकांनी पंकजा मुंडेंना लिहिलंय.

भाजप सरकारची ही जुलूमशाही ब्रिटिश सरकारला लाजवेल अशी असल्याची संतप्त प्रतिक्रिया अंगणवाडी सेविकांकडून व्यक्त केली जात आहे. वेळेवर मानधन न मिळणाऱ्या अंगणवाडी सेविकांची जगण्याचीच मारामार असताना ‘मेस्मा’ जाहीर करून सरकार अंगणवाडी सेविकांनाही आत्महत्येसाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोप राज्य अंगणवाडी कृती समितीचे नेते एम. ए. पाटील यांनी केला आहे.

Loading...

भाजप सरकारने राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या संपाचा धसका घेतला असून अंगणवाडी सेविकांनी संप करू नये यासाठी आता अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र अत्यावश्यक कायद्याच्या अर्थात मेस्माच्या कक्षेत आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
महिला उपजिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या कानशिलात लगावली