अंगणवाडी सेविकांना सहा हजार पाचशे रुपये वाढीव मानधन : पंकजा मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी सेविकांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. येत्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात अंगणवाडी सेविकांना सहा हजार पाचशे रुपये वाढीव मानधन तसेच भाऊबीजची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय शंभर टक्के घेणार आहे. तसेच मागील फरकाही दिला जाईल. मात्र, यापुढे अंगणवाडी सेविकांनी मोर्चे काढू नयेत, असे आवाहन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. नायगांव (ता. खंडाळा) येथे "माझी कन्या भाग्यश्री" योजनेच्या रथयात्रेचा समारोप व मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धोत्पादन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, महिला व बालविकासच्या राज्यमंत्री विद्या ठाकुर, आमदार मकरंद पाटील, संगिता ठोंबरे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रदिप घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पंकजा मुंडे म्हणाल्या, अंगणवाडी सेविका यांचे आहार बिलाचाही प्रश्न मार्गी लावणार आहे. तसेच यापुढे शुन्य टक्के व्याजदराने बचतगटासाठी कर्ज देण्याचा विचार आहे. तरी बचतगटाच्या माध्यमातून रोजगार उभा करावा. तसेच माझी कन्या भाग्यश्री या योजनेचे महत्व पटवुन देताना,या योजनेमुळे पात्र लाभार्थी मुलीच्या खात्यावर वयाच्या अठराव्या वर्षी एक लाख 46 हजार रुपये जमा होणार आहेत. म्हणून प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेला या भाग्यश्री योजनेमुळे हातभार लागणार आहे. नायगाव येथे भव्य सृष्टी उभारुन, पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर विजय शिवतारे यांनी मुलीच्या जन्माचे स्वागत करावे व आर्थिक सत्तेत मुलींना वाटा द्यायला हवा. यासाठी समाजाने मानसिकता बदलायला हवी असे आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी केले.

IMP