औरंगाबाद जिल्ह्यातील अंगणवाड्या होणार चकाचक; १० कोटींच्या निधीची तरतूद

child

औरंगाबाद : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील अंगणवाड्यासाठी १० कोटी रुपये निधी मंजूर केले आहे. त्यामध्ये जवळपास १३० नवीन अंगणवाड्या तसेच जुन्या नादुरुस्त अंगणवाड्यांची दुरुस्ती करण्याचे नियोजन जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातिल २ लाख ३५ हजार बालकांना याचा फायदा होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले.

जिल्ह्यामध्ये एकूण ३४५५ अंगणवाड्या आहेत. जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्यापैकी २७४९ अंगणवाड्याना इमारती आहे तर ७०६ अंगणवाड्याना इमारत नाही. यामध्ये २९४ अंगणवाड्याच्या इमारती भाड्याने घेण्यात आल्या आहे. तर उर्वरित ४०० पेक्षा जास्त अंगणवाड्यांचे ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, समाजमंदिर, मंदिर, ओटे आदी ठिकाणी भरवण्यात येतात.

जिल्ह्यातील जवळपास चारशे पेक्षा जास्त अंगणवाड्याच्या इमारती या नादुरुस्त स्थितीत आहे. यामुळे प्रत्येक ठिकाणी अंगणवाडीची स्वतंत्र इमारत असावी अशी मागणी अनेक वेळा जिल्हा परिषद सदस्यांनी केली होती. त्यानुषंगाने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या अंगणवाडयासाठी दहा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून त्यामध्ये जवळपास १३० नवीन अंगणवाड्या तसेच जुन्या नादुरुस्त अंगणवाड्यांची दुरुस्ती करण्याचे नियोजन विभागामार्गात करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या