ब्राम्हण बेरोजगार तरुणांंना ‘अच्छेे दिन’ ; मिळणार स्विफ्ट डिझायर

अमरावती : निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सत्तेत असणारी मंडळी लोकांना भुलवण्याचा प्रयत्न करतात आणि जनतेने आपल्या पारड्यात पुन्हा वजन टाकावे या हेतूने अनेक नवनवीन योजना काढत असतात.तशीच आंध्र प्रदेश सरकार आता बेरोजगार ब्राम्हण तरुणांंना स्विफ्ट डिझायर गाड्या वाटणार असल्याची माहिती मिळत आहे.याअगोदर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू  नायडू यांनी जनतेला स्मार्टफोन वाटणार असल्याची घोषणा केली होती.आता ते ब्राम्हण तरुंणाना गाड्या देणार असून गाड्या वाटपाचा कार्यक्रम आज नायडू यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडणार आहे. या कार्यक्रमात 30 बेरोजगार ब्राह्मण तरुणांना स्विफ्ट डिझायर गाडीच्या चाव्या देण्यात येणार आहेत.

आंध्रप्रदेश सरकारकडून या गाड्यांच्या किमती पैकी दहा टक्के रक्कम त्या तरुणांना भरावे लागणार आहेत तर प्रत्येकी दोन लाख रुपये ब्राह्मण वेल्फेअर कॉर्पोरेशनकडून देण्यात येणार आहे.उर्वरित रक्कम आंध्र प्रदेश सरकार ब्राह्मण क्रेडिट सोसायटीतर्फे लोनच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे.त्यामुळे ब्राम्हण समाजाच्या तरुणांंना आंध्रप्रदेशात अच्छेे दिन आले आहेत.याआधी नायडू यांनी राज्यातील जनतेला स्मार्टफोन देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी नायडू सरकार 14 दशलक्ष स्मार्ट फोन खरेदी करणार असल्याची माहिती आहे.