आंध्रात जगनमोहन सरकारचा धमाका : भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रात ७५ % आरक्षण

टीम महाराष्ट्र देशा- आंध्र प्रदेश सरकारने राज्यातल्या खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि उद्योगातील तब्बल 75 टक्के नोकऱ्या फक्त स्थानिक भूमिपुत्रांनाच मिळतील असा आदेश जारी केला आहे. देशात असा आदेश जारी करणारं आंध्र प्रदेश हे पहिलंच राज्य बनलं आहे. यापूर्वी मध्य प्रदेशने राज्यातील खाजगी नोकऱ्यात स्थानिक भूमिपुत्रांना 70 टक्के आरक्षण देणार असल्याचं सूचित केलं होतं. त्यासाठी कमलनाथ सरकार अध्यादेशही जारी करणार होतं. मात्र आंध्र प्रदेशमधील जगनमोहन सरकारने थेट निर्णय घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

हे आरक्षण खासगी उद्योग, खासगी कारखाने, संयुक्त उपक्रम आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीतील (पीपीपी) प्रकल्पांमध्ये लागू होणार आहे. खासगी क्षेत्रात आरक्षण देण्याची घोषणा अनेक राज्यांतील सरकारांनी केली असली, तरी देखील या घोषणेची अंमलबजावणी अजूनही कुणी केलेली नव्हती.