वाह सीएम ! आंध्रप्रदेशात 2 लाख 62 हजार वाहन चालकांना मिळणार प्रत्येकी 10 हजार

jagan reddi

नवी दिल्ली : कोरोनामुळे अनेक व्यवसाय संकटात आले आहेत. अनेक लघुउद्योगांवर संकटाची तलवार लटकत आहे. कोरोना संकट काळात ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. धंदा नसल्याने या चालकांवर अनेक संकटे आली आहेत.

या सर्व चालकांना आत आंध्रप्रदेश सरकारने आर्थिक मदत करत दिलासा दिला आहे. 2 लाख 62 हजार वाहनचालकांना प्रत्येकी 10 हजार रुपये मदत राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत देण्यात आली आहे. ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम आधीच्या कोणत्याही व्यवहाराची थकीत म्हणून बँक जवावट करणार नाही, असे मुख्यमंत्री वाय एस आर जगन मोहन रेड्डी यांनी स्पष्ट केले.

मुंबई पोलिसा तुला सलाम ! रक्त देऊन या खऱ्या योद्ध्याने वाचवला चिमुकलीचा जीव

सरकार रिक्षा आणि ऑटो चालकांना वार्षीक 10 हजार रुपये या योजनेअंतर्गत देते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने चार महिने आगाऊ ही मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. ‘वायएसआर वाहन मित्र’ योजनेअंतर्गत 2 लाख 62 हजार 493 लाभार्थ्यांना 262 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. हस्तांतरीत करण्यात येणार रक्कम दारुसाठी नाही तर योग्य कामासाठी वापरण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी वाहनचालकांना केले.

राजीव बजाज यांच्या वक्तव्याला राजकीय वास, संजय काकडेंची घणाघाती टीका