अंधेरीतील कामगार रुग्णालयात अग्नितांडव,मृतांचा आकडा वाढला

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईतील अंधेरी इथल्या इ.एस.आय.सी.च्या कामगार रुग्णालयातल्या आगीच्या दुर्घटनेतील दोन जखमींचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा आता 8 झाला आहे. यात जखमी झालेल्या इतर 176 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कामगार रुग्णालयात काल दुपारी चार वाजताच्या सुमारास आग लागली होती.धुरात गुदमरल्यामुळे जखमींचा आकडा वाढल्याची माहिती आहे. ‘ईएसआयसी’ कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीवर दोन तासांनंतर अखेर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.

चौथ्या मजल्यावरील ऑपरेशन थिएटरच्या जवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीमुळे रुग्णालय परिसरात धुराचे प्रचंड लोट वाहत होते. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी आग पूर्णपणे विझवण्याचा प्रयत्न करत होत्या

You might also like
Comments
Loading...