अंधेरीचा ‘तो’ पूल काही दिवस वाहतुकीसाठी राहणार बंद

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्टेशनजवळ असलेला पादचारी पुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याची घटना काल मुंबईत घडली होती. या घटनेत २ जण जखमी झाले होते. पूल अचानक कोसळल्याने नागरिकांमध्ये गोंधळ उडाला होता.

दरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल आता पुढील काही दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय.

वाहन चालकांनी जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे उड्डाण पूल , सांताक्रुज येथील मिलन सब वे उड्डाणपूल, मालाड गोरेगावसाठी मृणालताई गोरे उड्डाणपूल, विलेपार्ले येथील कॅप्टन गोरे उड्डाणपूल आणि अंधेरी-खार-मिलन सबवे या पर्यायी मार्गांचा वापर करावा, अशी मुंबई पोलिसांनी सूचना केली आहे.

पुणे शहरातील वाहतुकीत बदल

रिपब्लिकन पक्षाच्या शहराध्यक्ष पदाची निवडणूक 8 जुलै ला होणार