‘पदमावती’ ‘दशक्रिया’ वादात अनिसची उडी: प्रेक्षकांनी चित्रपट बघावेत यासाठी प्रसार करणार

पुणे: देशभरात पदमावती चित्रपटाच्या विरोधात राजपूत संघटनांकडून जोरदार विरोध केला जात आहे. तर महाराष्ट्रामध्येही ‘दशक्रिया’ विरोधात ब्राह्मण महासंघाकडून आंदोलने केली जात आहेत. दरम्यान या वादात आता अंधश्रद्धा निर्मूनल समितीने उडी घेतली आहे. न्यूड, दशक्रिया, पद्मावती ,दुर्गा या चित्रपटांना पाठिंबा देत देशातील प्रेक्षकांनी हे चित्रपट बघावेत यासाठी प्रसार करणार असल्याची माहिती अनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान चित्रपटातील आक्षेपार्ह गोष्टीच आम्ही स्वागत करत असून सर्व चित्रपटांच्या निर्मात्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या प्रसारासाठी एका ठिकाणी बोलावणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.