पहिल्या कसोटीपुर्वी अँडरसनने दिला टीम इंडियाला इशारा, म्हणाला ‘हिशोब चुकता करणार’

मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने सुरुवातीला झालेल्या डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना गमावला. आता ४ ऑगस्ट बुधवारपासून इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरु होत आहे.

या सामन्यापुर्वी इंग्लंडच्या संघाचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनने भारतीय संघाला हिशोब चुकता करायचा आहे असा इशाला दिला आहे. यावेळी बोलताना अँडरसन म्हणाला की, ‘पहिल्या कसोटी सामन्याच्या खेळपट्टीवर गवत असणार आहे. याबद्दल टीम इंडियाची कोणतीही तक्रार ऐकुन घेतली जाणार नाही. कारण यावर्षी जेव्हा आम्ही भारत दौऱ्यावर गेलो होते. त्यावेळी भारतीय संघाने घरच्या मैदानाचा फायदा घेत त्यांना हवी तशी खेळपट्टी बनवली होती. आता इंग्लंडला बदला घेण्याची संधी मिळाली आहे. तेव्हा आम्ही ही संधी सोडणार नाही. आता आम्ही हिशोब चुकता करु.’ असे अँडरसन म्हणाला.

यावेळी बोलताना पुढे अँडरसन म्हणाला की, ‘क्रिकेटमध्ये प्रत्येक देश हा घरच्या परिस्थीतीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र ही गोष्ट कधी कधी उलटी पडू शकते. कारण भारतीय संघातही चांगले गोलंदाज आहेत. पहिल्या कसोटी सामन्याची खेळपट्टी बघता या खेळपट्टीवर गोलंदाजाना मदत मीळु शकते. मात्र आमचा संघ नेहमीच वरचढ ठरेल’ असे अँडरसन म्हणाला. इंग्लंडमध्ये झालेल्या आतापर्यंतच्या ६२ कसोटी सामन्यापैकी भारताला केवळ ७ सामन्यात विजय मिळवता आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या