मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काल मुंबईत झालेल्या जाहीर सभेत भाजपावर जोरदार टीका केली आहे. अनेक मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर आता भाजपाकडूनही जोरदार प्रत्युत्तर मिळत आहे. भाजप धार्मिक आघाडीचे पदाधिकारी आचार्य तुषार भोसले यांनी टीका केली आहे. “कोणत्या तोंडाने तुम्ही हिंदुत्वाच्या बाता मारताय जनाब उद्धव ठाकरे,” असे तुषार भोसले म्हणाले आहेत.
………आणि कोणत्या तोंडाने हिंदुत्वाच्या बाता मारताय जनाब उद्धव ठाकरे ?@OfficeofUT @Dev_Fadnavis pic.twitter.com/iNslfHUN3O
— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) May 15, 2022
तुषार भोसले यांनी एक ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, काश्मीरी पंडित राहुल भट यांची हत्या केलेल्या आतंकवाद्यांना मोदी सरकारने २४ तासांच्या आत संपवलं कारण ते हिंदुत्वाचे रक्षक आहेत. पण इथे पालघरमध्ये साधूंची ठेचून हत्या करणाऱ्यांना २४ महिने उलटून गेले तरी अजूनही कोणताही दंड करण्यात आलेला नाही. हिंदु समाजाविषयी गरळ ओकणार शर्जिल उस्मानी अजुनही मोकाट आहे. त्याच्यावरही कोणतीच कारवाई झालेली नाही, आणि कोणत्या तोंडाने हिंदुत्वाच्या बाता मारता जनाब उद्धव ठाकरे? असा सवालही आचार्य भोसले यांनी विचारला केला आहे.
जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा, भाजपचा इशारा :
आज यावर भाजपाकडून प्रत्युत्तर मिळणार आहे. मोदी सरकार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केतकी चितळे यांच्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी टीकेची तोफ डागली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ट्विट करुन इशार दिला आहे. सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम.. अरे छट हा तर निघाला आणखी एक टोमणे बाॅम्ब, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला आहे. जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :