…तर शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांच्या जागी लोकसभा लढवणार – आठवले

रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा- आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झालीच नाही तर मी नागपूर येथील रामटेकमधून निवडणूक लढवणार आणि शिवसेना भाजपची युती झाली तर मुंबईतील शिवसेनेचे राहुल शेवाळे यांच्या जागी लोकसभा लढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.भाजप आणि शिवसेनेत काही अंतर्गत वाद असतील तर ते त्यांनी एकत्र बसून सोडवले पाहिजेत असा सल्ला देखील आठवले यांनी दोन्ही पक्षांना दिला. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आठवले यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

  • आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झालीच नाही तर मी नागपूर येथील रामटेकमधून निवडणूक लढवणार आणि शिवसेना भाजपची युती झाली तर मुंबईतील शिवसेनेचे राहुल शेवाळे यांच्या जागी लोकसभा लढवण्याचा प्रयत्न करणार.
  • बाळासाहेब ठाकरे यांची भाजप आणि शिवसेना यांच्यात कायम युती व्हावी, अशी इच्छा होती. परंतू सध्या शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे काही कारणामुळे नाराज आहेत. याविषयी मी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी अनेकवेळा बोललो असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्याशी चर्चा करावी यासाठी आग्रही आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आरक्षण विरोधी आणि संविधान विरोधी असल्याचा खोटा प्रचार करून काँग्रेस 2019 मध्ये सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे धडाधड रन्स बनवणाऱ्या आयपीएलमधील टीमच्या कॅप्टन सारखे आहेत आणि मी त्यांच्या संघातील बॅट्समन आहे.
  • पुण्यातील एसएसपीएमएस मैदानावर 27 मे रोजी होणार आरपीआयचे राष्ट्रीय अधिवेशन .
  • कोरेगाव -भीमा दंगल घडवणा-या ख-या सुत्रधाराचा शोध पोलिसांनी घ्यावा. यामध्ये संभाजी भिडे यांचा हात आहे का,याचीही पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि त्यामध्ये ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करावी. कायद्यापेक्षा संभाजी भिडे हे  मोठे नाहीत,यासाठी मी स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
उद्धवची आणि संज्याची औकात काढली त्याबद्दल उदयनराजेंच अभिनंदन:निलेश राणे
संज्या म्हणजे लुक्का;संज्या राऊत म्हणजे 'पिसाळलेला कुत्रा':निलेश राणे
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
'अजित पवार हे सध्याच्या मंत्रिमंडळातील अत्यंत कार्यक्षम मंत्री असून ते  कामाला वाघ आहेत'
नितेश राणेंची जीभ घसरली संजय राऊतांवर केली अश्लाघ्य भाषेत टीका
'हा देश मोदी आणि अमित शाह यांच्या बापाचा नाही'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
छत्रपतींच्या घराण्याचा अपमान सहन करणार नाही, आज सातारा बंद