…अन् राज्यपालांनी भर स्टेजवर महिलेचा मास्कच खाली ओढला! राज्यपालांच्या कृतीने नवा वाद

bhagatsingh koshyari

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या जन्मदिवसानिमित्त भाजपकडून देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. पुण्यात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुणे दौऱ्यावर असून त्यांनी देखील भाजपच्या एका कार्यक्रमात उपस्थिती लावली. यादरम्यान, त्यांनी केलेल्या कृत्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा या दरम्यान पुणे ऑन पेडल्स सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी एका महिला सायकल पटूचा राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मात्र यावेळी फोटो काढत असताना, राज्यपालांनी त्या महिलेच्या तोंडावरचा चक्क मास्क स्वतःच्या हाताने काढला. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तर दुसऱ्या बाजूला केंद्र आणि राज्य सरकारने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असताना. थेट राज्यपालांनी एका महिलेचा मास्क खाली घेतल्याने, विरोधक टीका करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या