…आणि सनी लिओनी अडकली कायद्याच्या कचाट्यात

 टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सनी लिओनीच्या बायोपिकचा ट्रेलर लाॅच  झाला आणि अवघ्या काही तासांतच अनेक व्हयुज या ट्रेलरला मिळाले. सनीच्या आयुष्यावर  ही ‘करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’  वेब सिरीज आहे. पण सनीच्या या वेब सिरीज वर संकट कोसळले ते म्हणजे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे प्रवक्ते दिलजीत सिंह बेदी यांनी हस्तक्षेप नोंदवला असून सिनेमात ‘करनजीत कौर’ या शब्दाच्या वापरावर नाराजी व्यक्त केली आहे.

सनी लिओनीने आपला धर्म बदलला आहे आणि तरी देखील ती आपल्या सिनेमात ‘कौर’ शब्द वापरत असल्यामुळे ती शिखांच्या भावनेशी खेळत आहे, असं मत दिलजीत सिंह बेदी यांनी व्यक्त केलं. तसेच याविरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याचं शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीतर्फे सांगण्यात आले.

विशेष म्हणजे या वेब सिरीजमध्ये सनी लिओनीचं स्वत:ची व्यक्तीरेखा साकारणार आहे. ‘करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ ही वेब सिरीज 16 जुलै पासून Z5 अॅपवर पाहायला मिळणार आहे.

एम. एस. धोनीचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सनीच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज