fbpx

…आणि चक्क सोनिया गांधींनी केली नितीन गडकरींची स्तुती

टीम महाराष्ट्र देश – सध्या दिल्लीत लोकसभेचे अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात आज सर्व खासदारांमध्ये आपापसात सोनिया गांधींच्या भाषणाची जोरदार चर्चा रंगली, त्याला कारणही तसेच होते.

सोनिया गांधी यांनी चक्क आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर चांगलीच स्तुती सुमने उधळली. त्यासोबतच बेंच वाजवून त्यांना जोरदार समर्थन दिले. लोकसभेत आज नितीन गडकरी प्रश्न उत्तरांच्या तासात भारतमाला परियोजना, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे आणि चारधाम प्रकल्पासंदर्भांत प्रश्नांना उत्तरे देत होते. त्यावेळी सोनिया गांधी यांनी गडकरींना सर्थान दिले.

भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि इत्तर पक्ष्याच्या सदस्यांनी राजमार्ग आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात झालेल्या कामांमुळे नितीन गडकरींची आज स्तुती केली. यावेळी गडकरी म्हणाले, ‘माझ्यासाठी हे विशेष असून मी खुप भाग्यवान आहे. कारण विरोधी पक्षांचे खासदार देखील माझ्या कामामुळे समाधानी आहेत.

उत्तराखंड मधील चार धाम जोडण्यासाठी राबवलेल्या प्रकल्पा संदर्भात उत्तर देताना त्यांनी गंगा नदीचे उदाहरण देत. प्रयागमध्ये पहिल्यांदा गंगा स्वच्छ असल्याचे सांगितले.