fbpx

…आणि महिलेचे प्राण वाचले; ‘काळ आला होता पण वेळ नाही’

bibtya

शेवगाव: ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा आज साक्षात्कार झाला. आपण चित्रपटात बिबट्या आणि माणसांमध्ये काल्पनिक लढाई पाहली असेल मात्र आज खामप्रिंप्री गावांमध्ये काल्पनिक वाटणारी खरी घटना घडली.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये खामपिंप्री या गावात बिबट्याने एका महिलेच्या अंगावर झडप घातली. बिबट्याने झडप घेतल्यानंतर सदर महिला स्वताला वाचवण्यासाठी खाली बसली. आणि बिबट्या सरळ महिलेच्या मागे असलेल्या विहरीत पडला. मागे विहीर असल्याची कल्पना महिलेला ही नव्हती आणि बिबट्याला नव्हती. त्यामुळे ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा आज साक्षात्कार झाला.

आत्माराम पावसे यांच्या शेतामध्ये ऊसतोड चालू असतानां उसाच्या फडामधुन मधून बाहेर पडलेल्या बिबट्याने तिथे ऊस तोड करणाऱ्या महिला कामगारांवर झेप घेतली, परंतु प्रसंगावधान साधून उभ्या असलेली महिला पटकन खाली बसली व झेप घेतलेला बिबट्या सरळ विहिरीत पडला, त्यानंतर मोठी आरडाओरड सुरू झाली व विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली. पाण्यामध्ये पोहत असलेल्या बिबट्याला वर काढण्याची प्रयत्न सुरू झाले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला पिंजऱ्यामध्ये कैद केले व सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

या कारवाई मध्ये वनविभागाचे एम बी राठोड वनपाल, सी.ये.रोडी, बी.यु.मंचारे, आर.ये.तरोडे कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. बिबट्याला विहिरीतून वर काढण्याचे ऑपरेशन जवळ-जवळ चार तास चालले.

1 Comment

Click here to post a comment