…आणि निवृत्ती महाराज इंदुरीकर ढसाढसा रडले

Indurikar maharaj

अहमदनगर: आपल्या कीर्तनातून अवघ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला हसवून अंतमुर्ख करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा ढसाढसा रडतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

इंदुरीकर महाराज राज्यभरात ठिकठिकाणी किर्तनाचे सोहळे घेत असतात. त्यांच्यासोबत व्यासपीठावर मृदंग वादन करणारे ठाणगाव येथील मृदंगाचार्य श्रीहरी रमेश शेळके यांचे वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी निधन झाले. अल्पशा आजाराने त्यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला. तरुण वयात श्रीहरी शेळके यांच्या निधनामुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

श्रीहरी रमेश शेळके यांचे अंत्यदर्शन घेताना इंदुरीकर महाराजांना अश्रू आवरले नाही. ढसाढसा रडत त्यांनी अश्रुंना वाट मोकळी करून दिली. श्रीहरी शेळके हे संपूर्ण तालुक्यात मृदंग वादनासाठी प्रसिद्ध होते. गेली 12 वर्ष ते इंदुरीकर महाराज यांच्यासोबत होते. इंदुरीकर महाराज महाराष्ट्रात जेथे कुठे किर्तनाचा सोहळा घेणार त्याठिकाणी श्रीहरी शेळके कायम त्यांच्या सोबतच असायचे. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

महत्वाच्या बातम्या