…..आणि मला त्या रात्री झोप लागली नाही – शरद पवार

sharad-pawar

टीम महाराष्ट्र देशा –  आम्ही ज्याप्रकारे कर्जमाफी करुन शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढले त्याचपध्दतीने या सरकारनेही शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी करायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यवतमाळ येथे कार्यकर्ता मेळाव्यात केली. यवतमाळमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला.

Loading...

शरद पवार पुढे म्हणाले की, येथे शेतीचे प्रश्न मांडत असताना या जिल्हयातून वर जावून ज्यांनी राज्याचे नेतृत्व केले त्या वसंतराव नाईक यांचे स्मरण झाले. मी पहिल्यांदा राज्यमंत्री झालो तेव्हा नाईक यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. या जिल्हयात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. मी कृषीमंत्री असताना मला माहिती मिळाली की यवतमाळमध्ये काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मला त्या रात्री झोप लागली नाही. मी थेट त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली आणि उपाययोजना करण्याबाबत सांगितले होते.Loading…


Loading…

Loading...